दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठाच्या महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. हा पक्षप्रवेश सोहळा दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उप जिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी आणि तालुका संघटक गोपाळ गवस यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात बळ मिळणार आहे. दीपकभाई केसरकर यांनी श्रेयाली गवस आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. “कार्यक्षम नेतृत्वाला नेहमीच योग्य सन्मान दिला जाईल आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षाला मजबूत करण्यासाठी होईल,” असे प्रतिपादन केसरकर यांनी यावेळी केले. दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी उप तालुका प्रमुख दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर, संजय गवस, सज्जन धाऊसकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












