आंतरराष्ट्रीय बिबट दिनी ‘त्याला’ मिळालं जीवदान!

विहिरीत पडलेल्या बिबटची वनविभागाकडून सुखरूप सुटका

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. शनिवारी रात्री स्थानिक ग्रामस्थ श्री. राजु मुणगेकर व ग्रामपंचायत लिपिक श्री. संदिप बुधवळेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र कांदळगाव मधील मौजे बुधवळे मळेशेत मधील विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती दिली.

वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर घटनेची पाहणी केली. वनविभागचे अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थ यांनी सुरक्षित रित्या सदर विहिरीत पडलेल्या बिबटला सुरक्षित रित्या पिंजऱ्यात जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर बिबट ची तपासणी करण्यात आली असून सदर बिबट सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. 03 मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी बिबट ची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. वन्यप्राणी बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. वन्यप्राणी बिबट हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार संरक्षित असून सदर प्राण्याची शिकार करणे, शिकारीचा प्रयत्न करणे हे गंभीर गुन्हे असून गुन्हेगारास द्रव्यदंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करण्यात यावा असे वनविभागाकडून सांगणेत आले आहे .

सदरचे बचाव कार्य मा. मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी व डॉ. सुनील लाड सहा. वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाख़ाली वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनरक्षक धामापूर अतुल खोत, वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे, श्री. संदिप परब स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर, श्री अनंत शिर्सेकर, श्री. संदिप बुधवळेकर, श्री. समीर टेंबुलकर, श्री. प्रकाश बिडवलेकर, श्री संदिप कुळेकर पोलीस पाटील व बुधवळे ग्रामस्थ यांच्या सहभागातुन यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आले आहे. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांचे