देवगड येथे ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण – सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क” स्तर-देवगड येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती-देवगड व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

दिवाणी ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारीकडील खटले किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा कार्यालयाकडे समिती-देवगड दाखल करावीत. सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), देवगड एस. एस. पचंडी यांनी केले आहे.