कनेडी (प्रतिनिधी) : जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस विविध धार्मिक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. यात २३ व २४ मार्चला वृद्ध, गरीब भाविकांसाठी ज्योतिबा, पंढरपूर, नरसोबाचीवाडी, तुळजापूर देवदर्शन, २९ मार्चला सकाळी सांगवे-कनेडी विभागीय कार्यालय येथे रक्तदान शिबीर, १ एप्रिलला मोफत मोतिबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबीर व सायं. ४ वा. मोफत आरोग्य साहित्य लोकार्पण, २ एप्रिलला कनेडी बाजारपेठ-सांगवे येथे पाककला स्पर्धा होईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे मिक्सर, शेगडी, कुकर व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. सांगवे-कनेडी बाजारपेठ येथे शुभेच्छा कार्यक्रम, ११ वा. दिव्यांग व मतिमंद शाळा करंजे येथे साहित्य वाटप, दुपारी १२ वा. अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा, ३ वा. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, सायंकाळी ५ जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यात शालेय गट प्रथम क्रमांक ३५५२ व. चषक व द्वितीय २५५२ व चषक आणि खुला गट प्रथम ५५५२, चषक व द्वितीय ४५५२ रुपये व चषक देण्यात येणार आहेत.












