नांदगाव (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड प्रशालेतील रोहित दहिबावकर व स्वानंदी सुतार या विद्यार्थ्यानी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्याची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी दहिबावकर यांने उंचउडीमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता दहावीमधील स्वानंदी सचिन सुतार हिने जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफेकमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या विद्यार्थ्याचे शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी-हडपिड मुंबईचे सर्व पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षकांनी अभिनंदन केले आले.













