एन्. ए. एम्. एस्. परीक्षेत कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, एम्. एम्. सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेमध्ये प्रशालेतील तब्बल ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांनी अभूतपूर्व असे यश संपादन करून प्रशाला व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे.

सदर परीक्षेमधील प्रशालेतील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे –

१) कु. सावंत गौरांग अरविंद

२) कु. घाडीगांवकर तनिष नंदकिशोर

३) कु. सावंत कनिष्क किशोर

४) कु. खोचरे पूर्वा सत्यवान

५) कु. मेस्त्री तन्मय आनंद

६) कु. सदडेकर सिद्धी रमाकांत

७) कु. चव्हाण नितेश प्रशांत

८) कु. सावंत प्रज्वल आशिष

९) कु. ठाकूर पूर्वा अमित

१०) कु. कांबळे सुशांत हणुमंत

११) कु. कुडतरकर श्रृंगी गोपाळ

या यशस्वीतेबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी तसेच पालक यांनी अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय विज्ञान प्रदर्शनात प्रतिवर्षी अनेक पारितोषिके प्राप्त करणारे प्रशालेतील विज्ञान शिक्षक डी. आर्. कसालकर, ए. ए. सावंत, आर्. एन्. भानुसे, एम्. पी. मेस्त्री यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.