Breaking News

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडीत वृक्षारोपण

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिवंगत नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगवडे कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन (काका) रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित तसेच सुधाकर येवले, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे आणि सुरेश खोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.