खारेपाटण तालुका निर्मिती करण्याबाबत व खारेपाटण रेल्वे स्टेशनला रेल्वे गाडया थांबविण्याबाबत दिले लेखी निवेदन
खारेपाटण (संतोष पाटणकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा.अशी खारेपाटण लागत असणाऱ्या सुमारे ४० गावांची मागणी असून याबाबत खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी नुकतीच खासदार विनोद तावडे यांची दिल्ली संसद भवन येथे भेट घेत खारेपाटण नवीन तालुका करण्यात यावा.याबाबत लेखी निवेदन दिले.तर खारेपाटण रेल्वे स्टेशन वर तुतारी एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस अशा दोन रेल्वे गाड्याना थांबा देण्यात यावा.या मागणीचे देखील लेखी निवेदन खासदार विनोद तावडे यांना दिले आहे.
खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण ग्रामस्थानी नुकतीच नवी दिल्ली येथे सिंधुदुर्गचे सुपुत्र खासदार विनोद तावडे यांची भेट घेतली.यावेळी कुणकवण गावचे पोलिस पाटील छोटू राणे,ऋषिकेश राऊत,संतोष चव्हाण,खारेपाटण पोलिस पाटील ओंकार चव्हाण, बबन तेली,महावीर होनाळे,रवींद्र चव्हाण,सचिन भालेकर,यांसह वीस ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सरपंच महेंद्र गुरव यांनी खासदार विनोद तावडे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी खासदार विनोद तावडे यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्याबाबत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने नवीन तालुका होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.तसेच खारेपाटण रेल्वे स्टेशनवर आता प्रवासी संख्या वाढू लागली असून असल्याने फक्त दिवा सावंतवाडी ही एकमेव गाडी येथे थांबते.त्यामुळे दशक्रोशीतील प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होत असून या स्टेशनवर तुतारी एक्सप्रेस व मांडवी एकप्रेस या दोन रेल्वे गाड्या थांबविण्यात याव्यात.अशी मागणी यावेळी खासदार विनोद तावडे यांचेकडे करण्यात आली.














