Breaking News

खारेपाटण येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने श्री प्रदीप श्रावणकर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त खारेपाटण बंदरगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार कार्यक्रम नुकताच जि.प.उर्दू शाळा बंदरगाव येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला श्री श्रावणकर सर,सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री इस्माईल मुकादम,बंदरगाव जि.प.उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम.नसीमा नाईक,शाळेच्या मुख्याध्यापिका मा
नाझनिन मुल्ला,पदवीधर शिक्षक श्री मुश्ताक कित्तूर,शाळा समिती सदस्य व पालक श्री शरीफ नाईक, मुमताज शेमणे,शबाना ठाकूर, सलीम शेमणे,अंगणवाडी सेविका तरनुम ठाकूर आदी मान्यवर व मुस्लिम समाज बांधव आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा जि.प.उर्दू शाळा बंदरगाव व बंदरवाडी मुस्लिम बांधवांच्या वतीने माजी उपसरपंच इसमिल मुकादम व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.नसीमा नाईक यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.” मी शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त होत असताना अनेकांनी माझे सत्कार केले.परंतु खारेपाटण बंदरगाव उर्दू शाळा व येथील मुस्लिम.समाज बांधवांनी केलेला सत्कार अतिशय महत्वाचा असून ही माझ्या प्रामाणिक काम केलेल्या कार्याची पोहच पावती आहे असे मी मानतो.” असे सत्काराला उत्तर देताना सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच इस्माईल मुकादम,श्री संतोष पाटणकर यांनी श्रावणकर सर यांना शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नाझनीन मुल्ला यांनी केले तर आभार पदवीधर शिक्षक श्री.मुश्ताक कित्तूर यांनी मानले.