मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग; ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा

देवगड (प्रतिनिधी) : मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मोंड ग्रामपंचायत येथे गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमीनमालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुतकर साहेब व नवपुते साहेब उपस्थित होते. त्यांच्यासमवेत नवनिर्वाचित देवगड पंचायत समिती सभापती मा. गणेश राणे, सरपंच सौ. शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट, ग्रामसेविका आचरेकर मॅडम, सिंधुसेवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश सरवणकर, माजी उपसभापती संजय देवरुखकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शेतकरी व जमीनमालकांनी आपली मते मांडत जोडरस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीबाबत विविध मुद्द्द्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

सभापती गणेश राणे यांनी ग्रामस्थांना विश्वास देताना सांगितले की, “मी स्वतः मोंडपार गावचा भूमिपुत्र असून तुमचा प्रतिनिधी म्हणून या पुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. गरज भासल्यास पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातूनही या कामाला गती देण्यात येईल.”

दरम्यान, मोंड-वानिवडे पूल प्रकल्पासाठी येत्या १६ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेत संबंधित ग्रामठराव मंजूर करण्यात येणार असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर मोंड-वानिवडे पूल प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशी आशा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. “काहीही झाले तरी मोंड-वानिवडे पूल झाला पाहिजे,” अशी ठाम भूमिका यावेळी सर्वांनी मांडली.