नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथे शिवसेना चषक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तात्या निकम, मज्जीद बटवाले, इमाम नावळेकर, आबू मेस्त्री सचिन लोके तसेच स्थानिक मान्यवर, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात फित कापून आणि श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेमुळे नांदगाव परिसरातील युवकांना आपली क्रीडा कौशल्ये दाखवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेमध्ये विविध संघ सहभागी झाले असून, दोन दिवस रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.
आयोजकांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
ही स्पर्धा बोरमळा क्रिकेट मैदान, नांदगाव येथे आयोजित करण्यात आली असून, परिसरात सध्या क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















