पालकमंत्री नितेश राणे यांनी कामाचा लेखी अहवाल पुराव्यानिशी सादर करण्याच्या सूचना
जिल्हा नियोजन समिती सभा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार निलेश राणे यांनी वन, लघु पाटबंधारे व उद्योग विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने केलेल्या कामांचा पुरावा, ४८ कोल्हापुरी बंधाऱ्यांची श्वेतपत्रिका, उद्योग विभागाची कामगिरी आणि जिल्हा परिषदचे १३ कोटी रुपयांचा अखर्चित निधी बाबत माहिती मागितली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले, तर कणकवली येथील पर्यटन केंद्राच्या उभारणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
वनविभागाच्या कामावर आमदार निलेश राणे यांनी असमाधान व्यक्त केले. वनविभागडून काय काम झाले ? जो निधी खर्च केला त्याचा काय उपयोग झाला. आज गव्हारेडा, आणि माकड व इतर वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी शेती करणे बंद केले. मग तुम्ही काय काम केले ते सांगा. त्याचे पुरावे अध्यक्ष पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे द्या मग आम्हाला खात्री पटेल. असे आमदार निलेश यांनी सांगितले.
जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने ४८ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे त्याची श्वेतपत्रिका द्या अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी मांडली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत सविस्तर माहिती द्या.
उद्योग विभागाकडून किती उद्योग आणि उद्योजक निर्माण केले याची माहिती आमदार निलेश राणे यांनी मागितली.
१३ कोटी निधी अखर्चित का ठेवला असा जाब आमदार निलेश राणे यांनी विचारला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी लक्ष घालून काम करून घ्या. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. बांधकाम सभापती साटविलकर यांनी काम करून घेऊ असे सांगितले. अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन वेळेत कामे पूर्ण करा. अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
पर्यटन मधून कणकवली येथे पर्यटन केंद्र उभारणीचे काम मंजूर झाले असून प्रक्रिया पूर्णत्वात गेली आहे. लवकरच काम सुरू होईल असे कार्यकारी अभियंता बागुल यांनी सांगितले.













