सावंतवाडी (प्रतिनिधी) : तळकोकणात दोन दिवस वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडत असताना आज सावंतवाडी शहरासह, तालुक्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली.
काही ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असताना आज सावंतवाडीतही पावसानं हजेरी लावली. यामुळे नाचणी पिकांसह आंबा, काजू पिकाला फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. ऐन एप्रिल महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा देखील मिळाल्याचे दिसून आले.












