कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रज्ञापुरी, कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनीक भक्त मंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ज्ञानदीप पुरस्कार २०२६’ यंदा अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान मुळ स्थानचे चेअरमन मा. श्री महेश कल्याणराव इंगळे साहेब यांना जाहीर करण्यात आला आहे.
स्वामी समर्थांच्या सेवेसाठी तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सार्वजनीक भक्त मंडळ, प्रज्ञापुरी (कोल्हापूर) यांच्या वतीने मा. महेश कल्याणराव इंगळे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













