Breaking News

आखवणे येथील विद्यार्थ्याची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्या मंदिर आखवणे नंबर 1 शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली जाते या सहलीमध्ये विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. यावर्षी ही संधी गोरे याला मिळाली आहे.

त्याला प्रशालेच्या शिक्षिका जोस्ना पाटील, वर्षा पडूळ, संतोष नागप, मुख्याध्यापक असलम पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने अध्यक्ष संतोष सुतार व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.