कणकवलीत २ रोजी हनुमान जन्मोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कांबळी गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिर येथे २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ६.४५ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ८ वा. श्रींची पूजा व अभिषेक, तीर्थप्रसाद, ९.३० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. श्रींची महाआरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद्र, रात्री ८.३० वा. बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ प्रस्तुत जल्लोष २०२६ चे उद्घाटन, ९ वा. नृत्य व गीतांचा कलाविष्कार, महिलांचा फॅशन शो होणार आहे.