दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने ‘दर्पण आयडॉल 2026’ जिल्हास्तरीय गायन स्पर्धेची रंगत

कणकवली (स्वप्नील तांबे ): युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि संगीत क्षेत्रात नव्या प्रतिभेला चालना मिळावी या उद्देशाने दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने ‘उत्तम पवार स्मृती जिल्हास्तरीय दर्पण आयडॉल 2026’ या कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ अशी ठेवण्यात आली असून, प्राथमिक फेरी रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत पार पडणार आहे. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे.

या कार्यक्रमात अनेक होतकरू गायक-गायिका आपले गायन कौशल्य सादर करणार असून, स्पर्धेमुळे जिल्ह्यातील संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रवेश विनामूल्य असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.