कणकवली (प्रतिनिधी) : एस.एस.पी.एम. च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीत महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT-CET) २०२६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर ऑफलाइन क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यातील सराव, संकल्पनात्मक स्पष्टता आणि परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. क्रॅश कोर्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा सखोल आढावा घेतला जाणार असून तो कॉलेज कॅम्पसमध्ये ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
हा क्रॅश कोर्स दि. १६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज * सकाळी ९.३० ते दुपारी १२.४५* या वेळेत घेण्यात येईल. संपूर्ण MHT-CET अभ्यासक्रमाचे नियोजनपूर्वक रिव्हिजन, प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन्स, वेळ व्यवस्थापन तंत्र आणि परीक्षेतील अचूकता वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन मिळणार असून विद्यार्थ्यांना थेट शंका निरसनाची संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे * प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर* यांनी सांगितले की, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशासाठी संस्था कटिबद्ध आहे. नियोजनबद्ध आणि अचूक सरावामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑफलाइन क्रॅश कोर्ससाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सचिन मेस्त्री (७५८८५०५२८५) किंवा इम्रान पटेल (९७३०८०२०४६) यांच्याशी संपर्क साधावा.












