Breaking News

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात येणार

खारेपाटण येथील युवा उद्योजक सतीश गुरव यांचा उपक्रम

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळावर दि.२३ जून २०२६ रोजी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजग श्री सतीश गुरव यांच्या वतीने खारेपाटण येथील सुमारे १०० ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री सतीश गुरव मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने देण्यात आली.
खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यरत असून या संघटनेत खारेपाटण पंचक्रोशीतील सुमारे १०० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष सभासद असून सामाजिक जाणिवेतून येथील सर्व जेष्ठ नागरिकांना मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पावसाळी छत्रीचे वाटप दानशूर व्यक्तिमत्व श्री सतीश गुरव यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.तर याचवेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा वाढदिवस देखील ज्येष्ठ नागरिकां बरोबर साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी खारेपाटण येथे उपस्थित रहावे.असे आवाहन सतीश गुरव मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.