कासार्डेवासीयांच्या कस्तूरीला भावपूर्ण श्रद्धांजली

कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार; ग्रामस्थांची भावना

कणकवली (प्रतिनिधी) : वैद्यकीय उपचारादरम्यान मृत झालेल्या कस्तूरी पाताडे हिला आज कासार्डे ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, मृत्यू झालेली मुलगी आम्हाला परत द्या, कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार तयार आहोत. दहा कोटी दिला तरी आम्हाला मुलगी परत मिळणार नाही अशा भावना माजी उपसभापती प्रकाश पारकर यांनी व्यक्त केल्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, माजी सरपंच संतोष पारकर, रविंद्र पाताडे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.