देवगड बंदरात दाखल गुजरातसह अन्य राज्यातील शेकडो नौका आश्रयासाठी दाखल
देवगड (प्रतिनिधी): हवामान विभागाने वादळसदृश वातावरणाचा इशारा दिल्यामुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.यामध्ये गुजरातमधील नौकांचाही समावेश आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा मच्छिमारांना दिला आहे.समुद्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून वादळसदृश स्थितीमुळे दि. २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा देण्यात आल्यामुळे मच्छिमारीसाठी गेलेल्या शेकडो नौकांनी देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे.स्थानिक नौकांबरोबरच गुजरात राज्यातील नौकाही देवगड बंदरात दाखल झाल्या असून यामुळे देवगड बंदर सध्या गजबजले आहे.सध्या नौकांना बांगडा, तोवर, पेडवे, गेजर अशी मासळी मिळत होती मात्र वारंवार निर्माण होणाèया वादळसदृश वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून सध्या बाजारपेठेत मासळीचे दर कडाडले आहेत. फोटो कॅप्शन वादळसदृश वातावरणामुळे समुद्रातील मच्छिमारी सध्या बंद असून गुजरातसहीत शेकडो नौका सध्या देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.












