कुडाळ नगरपंचायतीच्या विकासाचा नवा टप्पा!

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज कुडाळ येथे नवीन नगरपंचायतींना मिळणाऱ्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरण या महत्वाकांक्षी कामाचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे, श्री. संजय पडते, नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेना प्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, उपनगराध्यक्ष श्री. किरण शिंदे, मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर, श्री. आनंद शिरवलकर, श्री. दादा साईल, श्री. विनायक राणे, श्री. दीपक नारकर तसेच स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार निलेशजी राणे यांनी कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन केले, तसेच उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनीही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य व पाठबळ देण्याची ग्वाही दिली.