Breaking News

स्थानिक युवकांवर गुन्हे दाखल | कणकवलीत संताप

सायंकाळी पोलीस निरिक्षकांची घेणार भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील 2 युवतींचा विनयभंग परप्रांतीय 2 युवकांनी केल्याची घटना 15 मे रोजी घडली होती. त्यानंतर संबंधित परप्रांतीय युवक ज्या सलुनमध्ये नोकरी करत होते. त्या सलुनच्या संचालिका असलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात कर्मचा-यांना मारहाण करत शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी कणकवली शहरातील 6 युवकांसह त्या 2 पीडीत युवतींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने कणकवलीकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे यांची कणकवलीतील नागरिक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भेट घेवून शहरातील महिला सुरक्षा संदर्भात चर्चा करून परप्रांतीय कामगारांच्या नोंदी पोलीस ठाण्यात ठेवण्यात याव्यात, संबंधित परप्रांतीय हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत का ? याची कसून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.