कळसुली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र पांडुरंग दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी नूतन उपसरपंच दळवी यांचे अभिनंदन केले.
निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांनी नूतन उपसरपंच राजेंद्र दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांनी दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी माजी सरपंच अतुल दळवी, उपसरपंच गजानन मटकर, जिल्हा परिषद सदस्य. शितल. दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सोसायटी चेअरमन रामचंद्र नाईक तसेच ग्रामविकास अधिकारी प्रशांत वर्धम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या निवडीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई, नंदकुमार परब, अरुण दळवी, प्रवीण दळवी, दीपक मेस्त्री, जयवंत परब, कृष्णा दळवी, रवी दळवी, अमित दळवी, स्वप्नील गोसावी, अनिल दळवी, संतोष दळवी आणि दिनकर दळवी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन उपसरपंच राजेंद्र दळवी यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.














