कणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षदा वाळके यांच नाव निश्चित

उपसभापती पदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांच नाव निश्चित

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज सोमवारी होत असून यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी हर्षदा वाळके तर उपसभापती पदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांनी अर्ज दाखल केला. सभापती व उपसभापती पदासाठी फक्त दोनच अर्ज दाखल झाले असल्याने सभापतीपदी हर्षदा बाळके तर उपसभापती कधी राजेश उर्फ असून सावंत यांची निवड आता निश्चित झाली आहे.

कणकवली पंचायत समिती ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघांमध्ये येते. पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आहे. साहजिकच या पदासाठी अनेक दावेदार होते. मात्र यापूर्वी पंचायत समिती सदस्य सरपंच या पदांवर काम केलेल्या व आता नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या हर्षदा वाळके यांनाच सभापती पद भुषविण्याची संधी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तर यापूर्वी भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केलेल्या व आता वरवडे पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या राजेश उर्फ सोनू सावंत यांना उपसभापती पद भूषविण्याची संधी नितेश राणे यांनी दिली आहे. सोनू सावंत यांच्या पत्नी राधिका सावंत या देखील यापूर्वी वरवडे पंचायत समितीच्या सदस्या होत्या.

सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामा निर्देशनपत्रे सादर करायचे आहे. तर दुपारी तीन वाजल्यानंतर सभापती पदाची अधिकृत निवड प्रक्रिया होणार असल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली आहे.