महिला दिनानिमित्त कुपवडे जि.प. शाळेत पाककला स्पर्धा व फनी गेम्स

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कुपवडे जिल्हा परिषद प्राथमिक पूर्ण शाळा क्रमांक १ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

पाककला स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अवनी मडव, द्वितीय क्रमांक श्रावणी सावंत तर तृतीय क्रमांक सौ. अंकिता परब यांनी पटकावला. विजेत्या व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी “निपुण माता सन्मान सोहळा” देखील आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला कुपवडेचे सरपंच दिलीप तवटे, उपसरपंच दिवाकर परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित परब, पोलिस पाटील श्रावणी सावंत, पोलिस पाटील गोसावी, भरणी पोलिस पाटील काजरेकर, सौ. मडव मॅडम, सौ. परब मॅडम, तसेच कुपवडे नंबर १ शाळेचे विद्यार्थी व पालक, फौजदारी शाळेचे पालक आणि गवळगाव शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.