‘आभारपत्रा’ची अनोखी दिवाळी !

दिविजा वृद्धाश्रमास मांडखोल शाळेतर्फे आभारपत्र

चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोलवाडी शाळेत कणकवली, असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमाकडून सर्व शाळेतील मुलांना दिवाळीसाठी सुगंधी उठणे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्व मुलांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून या आबालवृद्धांनी तयार केलेल्या कामाप्रती आभारपत्र लिहून दिवाळीचा गोड संदेश दिला. सध्याच्या आधुनिक युगात पत्रलेखन कालबाह्य होत असताना मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेले हे नाविन्यपूर्ण काम निश्चितच कौतुकास्पद आहे. सदर उपक्रमासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मुख्याध्यापक दिपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक व माजी विद्यार्थी चौके मांडखोलवाडी यांचे कौतुक केले आहे. सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.