कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विकासासाठी तसेच मत्स्योद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विरोधी पक्षांकडूनही घेतली जात असल्याने त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत असल्याचे गजानन उपरकर यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळांच्या वतीने परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून मंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून राज्याच्या विकासासाठी अधिकाधिक जनहिताची कामे घडावीत, अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायिक आणि मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सुरू ठेवलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळावी, अशी सदिच्छा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुस्कर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर, गजानन उपरकर, मधुकर पाटील, पुरोहित मुळीये (काका), श्रीरंग पारगावकर, सचिन कुवळेकर, शिवप्रसाद घाडीगावकर, महेश वांगणकर, प्रसाद पाताडे, करण सावंत, सायली सावंत, नितीन खोत आदी मान्यवर उपस्थित होते.













