कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर रावले यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : तालुक्यातील कणकवली कासार्डे जांभूळवाडी येथील सुधाकर आत्माराम रावले (वय ६१) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्षे कासार्डे येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे रास्त दराचे धान्य दुकान क्र.१ व २ चालवत असल्याने ते कासार्डेत रावलेभाऊ म्हणून परिचित होते. मूळ हरकुळ खुर्द येथील रावलेभाऊ मनमिळाऊ व हजरजबाबी स्वाभावाचे असल्याने त्यानी अनेक माणसे जोडण्याबरोबर कासार्डे परीसरात सामाजिक बांधिलकीतून मदतकार्य केले. श्री सिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक खजिनदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्याच्या निधनाची बातमी समजताच परीसरात हळहळ व्यक्त केली जात कासार्डे व्यापारी संघाने दुकाने बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.