कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे.
डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत दर्जेदार व समर्पित सेवा दिली होती. रुग्णांच्या समस्या समजून घेत त्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. आपत्कालीन परिस्थितीतही ते तातडीने रुग्णालयात दाखल होत रुग्णांना सेवा देत.












