पालकमंत्री नितेश राणेंची घेतली प्रवीण भोंसलेंनी भेट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई येथे महाराष्ट राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माजी मंत्री प्रवीण भोंसले यांनी भेट घेतली.

जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. दोन आवश्यक विकास कामांचे निवेदन स्वीकारून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले. सिंधुदुर्गच्या विकासाठी पालकमंत्री जे प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नांना आपले पूर्ण सहकार्य राहील असे प्रवीण भोसले यांनी स्पष्ट केले आहे.