कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : स्वामीसेवक कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण व पूजन सोहळा तसेच कै. बाळासाहेब इंगळे यांच्या नूतन अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरात करण्यात आले आहे.
पुण्यस्मरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिर, एक्युप्रेशर उपचार शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून समाजोपयोगी उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तसेच सोलापूर जिल्हा इंगळे कार्यशाळा आणि कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे गुणवंतांना देण्यात येणार आहेत.

देशभरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विविध संत-महंत, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी उपस्थित राहणार असून अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक महेश कल्याणराव इंगळे व प्रथमेश महेश इंगळे मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.