वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सागर पाटोळे आणि कृष्णा कातकर हे दोघे आर्चिणे घाणेगड येथील कुर्ली धरणाच्या कलव्याच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. कलव्याच्या बाजूने कच्चा रस्ता असून रस्त्यावरून अज्ञात मोटरसायकल वरून आले असता त्यांनी आपल्या दिशेने बंदूकीतून गोळी मारल्याने सागर सुरेश पोटळे हा मयत झाला तर साथीदार कृष्णा कातकर हा जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता हे अज्ञात इसम कोण शोधून काढणे पोलिसासमोर मोठे आव्हान आहे मंगळवारी रात्री ९:३० ते १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली वैभववाडी पोलिसांना रात्री ११:३० वाजता समजल्यावर पोलीस निरीक्षक मनोज सोलवनकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले अतिरिक्त पोलीस अधिकारी नयोनी साटम पोलिस अधीक्षक दहिकर, एल सीबी टीम, स्वान पथक, ठसे तज्ज्ञ टीम पोहचली बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत वैभववाडी पोलीस ठाण्यात बसून तपासाचा आढावा घेत होते.
जखमी कातकर याने दिलेल्या माहिती वरून जे अज्ञात व्यक्ती चे कपडे कोणते होते…. गाडी कोणत्या कंपनीची एवढी सविस्तर माहिती पोलिसांना दिली मात्र त्या अज्ञातना तो ओळखू शकला नाही त्यामुळे तपसात अडथळा येत आहे एकूणच पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत त्यामुळे लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.












