संजय आग्रेंनी घेतली शिक्षणमंत्री दादा भूसेंची भेट !

सिंधुदुर्गातील माध्य. शिक्षण विभागातील त्रुटींकडे वेधलं लक्ष

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील त्रुटी संदर्भात एकनाथ शिंदे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील विविध प्रशासकीय त्रुटी, कामकाजातील विलंब आणि शाळा-शिक्षकांना व संस्थाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागाचा कारभार अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि जलद गतीने व्हावा यासाठी आग्रे यांनी शिक्षण मंत्र्यां सोबत चर्चा देखील केली. यावेळी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शालेय प्रशासकीय प्रक्रिया, तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाची बैठक लावून यावर आपण योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल देखील उपस्थित होते.