मेढा येथे ९ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : मालवण-मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार, ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे, रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण नृत्य व घुमट वादन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार व शंकर मंदिर मेढा महिला मंडळ प्रस्तुत ‘रंगमेळा’ हा टाळ नृत्य, लेझीम नृत्य व तुळशी नृत्याचा समावेश असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. शुक्रवार, १३ मार्च रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.