मयत व्यक्तींची नावे आली समोर
कल्याण (प्रतिनिधी) : आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींपैकी अनेकजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांची नावे आता समोर आली आहेत. अपघाताची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील तीन मुलींचाही मृत्यू झाला आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी देखील दुर्घटनेत ठार झाल्याचे समोकर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.












