मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर न्यावे-भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केद्रात नोंदले जात नसल्यामुळे सबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्षे वंचित राहत आहेत.
सन २०२२/२३ मध्ये महावेद प्रकल्प अंतर्गत वेगुर्ला तहसील कार्यालयासमोर असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदलून कुशेवाडा येथे नेण्यात आले होते. याच धर्तीवर मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे जेणेकरून ग्रामीण स्तरावरील सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळू शकेल. अशी मागणी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पत्र देत केली आहे. यावेळी भाजप मालवण तालुका चिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम, राजु परूळेकर, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.












