काम करा अन्यथा पद विसरा !

आमदार निलेश राणे यांचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

कुडाळ (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन निवडणूक कार्यक्रमांमध्ये आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे ही जबाबदारी ओळखून सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे अन्यथा तुमच्या पदाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

कुडाळ येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन न करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये निवडणूक आयोगाने नव्याने राबवल्या जाणाऱ्या मतदार नोंदणी तसेच पडताळणी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे, राज्याचे समन्वयक सचिन जोशी, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, संजू परब, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नीता कविटकर, संपर्कप्रमुख बाळ चिंदरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, सावंतवाडी सभापती सुस्मिता जाधव, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मनोज राणे, सचिन वालवलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, विनायक बाईत, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेमध्ये आपल्या कार्यकत्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे हे काम एक महिना चालणार आहे त्यामध्ये आपली भूमिका आणि आपले काम प्रामाणिकपणे करणार त्याला भविष्यात चांगले दिवस येतील आणि जो काम करणार नाही त्याला पदावरून कमी केले जाईल हे सगळ्यात महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमासंदर्भात सेवानिवृत्त उपायुक्त अविनाश सणस यांनी मार्गदर्शन केले.