तळेरे बसस्थानकाचे नुतनीकरण, काँक्रिटीकरण करा

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील मध्यवर्ती तळेरे बस स्थानकाचे नूतनीकरण व परिसर कॉक्रिटीकरणाच्या कामांना गती मिळावी, यासाठी कणकवली भाजपा मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्याकडून मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे याना निवेदन सादर करण्यात आले. तळेरे बुथ अध्यक्ष शैलेश सुर्वे, वैभववाडी माजी सभापती बंड्या मांजरेकर उपस्थित होते. तळेरे बसस्थानक हे मुंबई गोवा व तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्थानक असल्याने मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या येजा करीत असतात कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील परीसरातील गावातील नागरीकांची सुध्दा वर्दळ मोठी असते. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवासी यांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन लवकरात व लवकर बसस्थानकाची दुरुस्ती व सुविधा उभारण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.