Breaking News

तळेरे बाजारपेठेत नरकासुराची धिंड काढून दीपोत्सव साजरा !

तळेरे (प्रतिनिधी) : बाजारपेठ मित्र मंडळ तळेरेच्या वतीने, दीपोत्सवाचे पूर्वसंध्येला नरकासुराची  धिंड काढण्यात आली आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे!  अधर्मा तून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी बाजारपेठ मित्र मंडळ तळेरे चे अध्यक्ष सागर डंबे, उपाध्यक्ष आप्पा कल्याणकर, सरचिटणीस साई रंजन खटावकर तसेच मंडळाचे तमाम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.