वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ३ मधील रिक्त जागेसाठी (सर्वसाधारण महिला) झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या २३६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपच्या सुप्रिया सुशांत गावडे (१९७ मते) पराभूत झाल्या. नोटासाठी ११ इतके मतदान झाले.
मंगळवार २८ एप्रिल रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ परबवाडा या केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली होती. आज बुधवारी याची मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, विजय नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मठ माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत, अरविंद बागायतकर, स्वप्नील गडेकर, समीर नाईक, सौ. नाईक, प्रशांत बोवलेकर, दिगंबर परब, महादेव परब, सखाराम परब, तुषार आईर तसेच मठ ग्रामस्थ उपस्थित होते.












