साईबाबा सोशल क्लबची सामाजिक बांधिलकी

दिवाळीनिमित्त करणार मिठाई व भेट वस्तूंचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या वागदे येथील साईबाबा सोशल क्लब ने आपली सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्याचे आयोजन केले आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हे एक समाजोपयोगी पाऊल साईबाबा सोशल क्लब उचलत आहे.

साईबाबा सोशल क्लब नेहमीच आपल्या दातृत्वाने समाजोपयोगी काम करत असतात. युवकांसाठी कॅरम स्पर्धा विविध क्रीडा स्पर्धा घेणे, महिलांसाठी खेळ पैठणीचा सारखे उपक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून साईबाबा सोशल क्लब आपली समाजाप्रती असणारी भूमिका प्रामाणिकपणे बजावत असतो. आता दिवाळीनिमित्त नागरिकांना मिठाईचे आणि भेट वस्तूंचे वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचे प्रयोजन साईबाबा सोशल क्लब ने केले आहे.