रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना; e-KYC अनिवार्य, अन्यथा मोफत धान्य बंद होण्याची शक्यता

नवी दिल्ली (ब्युरो न्युज) : रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. रेशन व्यवस्थेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केलेले नाही किंवा e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना मोफत धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारने ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिली असून नागरिक घरबसल्या e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करता येते. या उपक्रमामुळे फसवणूक आणि डुप्लिकेट लाभार्थी कमी होतील तसेच खऱ्या लाभार्थ्यांना योग्य वेळी धान्य मिळेल अशी अपेक्षा आहे.