भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा संदीप हडकर, पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे, सौ सीमा परुळेकर, शाम झाड, संतोष गावडे (गुरुजी), सौ. योजना कांबळी, सौ. माधुरी मसुरकर तसेच माजी उपसभापती राजू परुळेकर, संदीप हडकर, जग्गू चव्हाण, देवानंद लोकेगावकर, आबू कांबळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.