शिवशौर्य प्रतिष्ठानाच्यावतीने किल्ले गगनगड येथे दीपोत्सव साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवशौर्य प्रतिष्ठानच्यावतीने किल्ले गगनगड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव सोहळा उस्ताहात संपन्न झाला. यावेळी दीपोत्सव व मशाल महोत्सव सोहळा आणि गडदेवता यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी संपूर्ण गगनगडावर १००० पणत्या लावण्यात आल्या होत्या यामुळे किल्ले गगनगड तेजोमय प्रकाशात उजळून निघाला होता.तसेच शिवशौर्य प्रतिष्ठान ही संस्था मुंबई मध्ये – वसई किल्ला, बेलापूर किल्ला,डहाणू किल्ला, सेगवागड याठिकाणी आपले सेवाभावी कार्य चालू ठेवले असून किल्ले गगनगड येथे सातत्याने या संस्थेचे सामाजिक सुरू असतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले खारेपाटण येथे देखील किल्याची साफ सफाई स्वच्छता आणि इतिहास जगविणारे कार्यक्रम सुरू असतात.

किल्ले गगनगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी खारेपाटण येथील मावळे श्री दिगंबर राऊत तसेच अजित कुडकर,प्रसाद भोई,संदेश कुडकर,देविदास शेंगाळे,शंकर तारे , शुभम मांजरेकर,अतुल हडशी,राज चिले,दशरथ इंगळे,प्रवीण शेंगाळे, सुजित शेंगाळे,गणेश माने,संदेश हर्यान,योगेश इंगळे आदी प्रमुख शिवप्रेमी कार्यकर्तेउपस्थित होते. तसेच किल्ले गगनगड व्यवस्थापक श्री बापूसाहेब पाटणकर,किल्ले गगनगड ट्रस्टी संजय दादा पाटणकर,किल्ले गगनगड ट्रस्टी रमेशराव माने, गगनगड सर्व सेवेकरी यांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.