खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने मानवंदना

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त खारेपाटण येथील पंचशील नगर परिसरात जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. शाम कोळसुलकर, उपाध्यक्ष श्री. नारायण कोळसुलकर, श्री. राजन कोळसुलकर, खजिनदार श्री. महेश कोळसुलकर तसेच मंडळाचे सदस्य भूषण कोळसुलकर, प्रवीण कोळसुलकर, संजय कोळसुलकर, संदेश तेली, दिनकर गांधी उपस्थित होते. तसेच पंचशील नगरचे अध्यक्ष श्री. संतोष पाटणकर यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.