कणकनगर मधील युवकांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी कणकनगर-शिवशक्तीनगर येथील युवकांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष मा समीरजी नलावडे , उपनगराध्यक्ष मा बंडूजी हर्णे , भाजपा शहर अध्यक्ष मा सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे , भाजपा योवामोर्चा जिल्हाध्यक्ष मा संदीप मेस्त्री यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला .

यावेळी अनादी साईल , साहिल परब , प्रथमेश पांगम , ओंकार पांगम , विकास पांगम , सुयोग कदम , भार्गव रायकर , प्रथमेश शिंदे , योगेश बाईत , रोहित जाधव इत्यादी युवकांनी प्रवेश घेतला .