Breaking News

CNG वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

कणकवली वागदेतील CNG पंप आजपासून सुरु

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत CNG पंप नाईक पेट्रोलियम वागदे येथे मंगळवार १६ जून २०२६ रोजी पासून सुरू करण्यात येणार आहे. नाईक पेट्रोलियम वागदे यांच्या व्यवस्थापनच्यावतीने ही माहिती देण्यात आली. कणकवली शहरात सीएनजी पंपाकरिता मंजुरी मिळाल्यानंतर कणकवलीत अनेक जणांनी सीएनजी वाहने खरेदी केली होती. सध्याच्या स्थिती सीएनजी करिता लागणारी रांग आणि वाहतूक कोंडी पाहिली असता कणकवलीत अजून सीएनजी पंपची आवश्यकता होती. नाईक पेट्रोलियमच्यावतीने हा सीएनजी पंप सुरू केला जात असल्याने आता सीएनजी वाहनधारकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.