रिपब्लिकन सेनेच्या सिंधुदुर्ग उत्तर जिल्हाध्यक्षपदी रमेश बावडेकर

वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश बावडेकर तर वैभववाडी तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र जाधव आजविलकर यांची निवड करण्यात आली आहे.

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच मुंबई येथे यांची निवड जाहीर केली आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश करुळकर, जिल्हा प्रवक्ते अनिल तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळकृष्ण जाधव, जिल्हा सदस्य धनाजी जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रिपब्लिकन सेना सिंधुदुर्गातील घराघरात पोचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून त्यांचा विश्वास सार्थ करून असे मत निवडीनंतर रमेश बावडेकर व राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.