हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथे भव्य उत्सवाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथील श्री हनुमान नगर परिसरात यंदाही भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मित्रमंडळ कोष्टेवाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री हनुमान जन्मसोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर महाअभिषेक आणि पूजापाठ पार पडणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर हरिपाठ व महाआरती होणार आहे. रात्री वारकरी भजन व ढोल वादनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.